रणनीती चा “पाच चा पंच”

swot-graphic

आपली नीती

जेव्हा संधी आणि क्षमता, तैयारी सोबत येतात, तेव्हा यश हे निशित असते. कुठल्याही यशस्वी निवडणुकीची मोहीम किमान एक वर्ष आधी सुरु होते असा रणनीती चा विश्वास आहे. तुमच्या क्षमते सोबत आमची सेवा तुमचं यश निश्चित करेल. कौशल्य नीती यशस्वी मोहिमे साठी खूप महत्वाची असते. आमच्या निवडणुकीच्या नीती ची सुरुवात ही तुमच्या स्वप्नांना आकार देण्यापासून सुरु होते. आम्ही समजतो प्रत्येक मतदारसंघ हे विशिष्ट असते आणि प्रत्येक मतदारसंघाची गरज हि वेगळी असते. आम्ही आपली वर्तमान स्थिती समजुन आणि असलेल्या संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून तुमच्या विजयाची जास्तीत जास्त शक्यता वाढवण्यासाठी प्रयत्न करू.

canvassing

घरोघरी प्रचार

कोणतीच निवडणूक ही कुशल स्वयंसेवका शिवाय लढवता येत नाही. घरोघरी जाऊन प्रचार करण्याची पद्धत हि जुनी पण यशस्वी आहे. आपल्या नेत्याची किंवा त्यांचा माणसांची भेट हि मतदारावर मोठा प्रभाव उमटवते कारण मानवी संवाद हा जाहिरातीचा सर्वात चांगला उपाय आहे. आम्ही तुम्हाला कसून आणि काळजीपूर्वक स्क्रीनिंग प्रक्रियेतून पास झालेले स्वयंसेवक प्रदान करू, जे तुमचे नाव, कार्य आणि विचार प्रत्येक घरामध्ये पोहचवतील.

13731-NPBFOK

सोशल मीडिया पॅकेज

जनता त्यांचा नेत्या बद्दल ची माहिती ही गुगल वर शोधत असते पण जेव्हा लोक माहिती शोधतात आपल्याला या गोष्टीची खात्री नक्की हवी कि आपण ज्या गोष्टी त्यांचापर्यंत पोहचवू इच्छितो तो मजकुर इंटरनेट वर हजर आहे. आज चा घडी ला राजकारणी माणस दररोज सोशल मीडिया च्या माध्यमातून तपासली जातात आणि आम्ही आपली माहिती इंटरनेट वर आणण्यास मदद करतो. आमच्या सोशल मीडिया पॅकेज मध्ये सुंदर प्रकारे डिझाईन केलेली वेबसाईट, ट्विटर अकाउंट, फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि व्यवस्थितरीत्या बनवलेले विकिपीडिया पेज चा समावेश आहे.

12387-NO7514

प्रभाग नियोजन

आज माहिती तंत्रज्ञानाच्या जगात माहिती हीच शक्ती आहे. निवडणुकीच्या वेळी तुमच्या मतदार संघाची संपूर्ण माहिती, मतदारांशी प्रभावीपणे संवाद साधण्यास खूप महत्वाची ठरते. आम्ही तुमचा मतदार संघाचा अहवाल तैयार करू ज्यात मतदारा संबंधित  इमारत / घर निहाय माहिती, जसे की नाव , वय, लिंग , संपर्क माहिती, व्यवसाय इत्यादी (विशिष्ट शर्तींच्या अधीन) गोष्टींचा समावेश असेल. अशा प्रकारची माहिती एसएमएस, ई-मेल मोहीमेंसाठी आणि निवडणुकीचा काळात मतदारांशी  संपर्क साधण्यात खुप  महत्वाची असते.

09

मतदारसंघ संशोधन आणि जाहीरनामा निर्मिती

प्रभाग नियोजनाच्या नंतर च पाऊल म्हणजे मतदारसंघ संशोधन. मतदारसंघ संशोधन हे मतदारांच्या गरजा समजणे, विश्लेषण करणे आणि मतदार संघाचा  सखोल अभ्यास करणे आहे. आमची टीम आपल्या मतदार संघाच्या संपूर्ण अभ्यास करून मतदार संघाच्या समस्या, गरजा आणि मतदारांशी निगडीत तपशीलवार अहवाल तैयार करून देतील. एकदा संशोधन पूर्ण झाल्यानंतर, आम्ही आपल्याला जाहीरनामा (Manifesto) तैयार करण्यास मदद करतो.

 business_9

कम्प्लेंट लॉगिंग सिस्टम

आम्ही एक पूर्ण सोशल मीडिया आधारित वार्ड /मतदारसंघ कम्प्लेंट लॉगिंग सिस्टम  ऑफर करतो.

या सिस्टम मध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल :-

  • व्यवस्थितरीत्या बनवलेले फेसबुक पेज
  • ट्विटर अकाउंट (eg: @XYZwardComplaints)
  • कम्प्लेंट साठी विशेष वाँट्सअँप नंबर

आपले मतदार वार्ड मधल्या तक्रारींचे फोटो काढून आपल्या विशेष वाँट्सअँप नंबर पाठवू शकतील  नाहीतर फेसबुक किंवा ट्विटर वर टॅग करू शकतील. आमची टीम दररोज या तिन्ही फीड च निरीक्षण करेल आणि आठवड्यातून दोनदा  किंवा आपल्या गरजेनुसार आपल्याला अहवाल सादर करेल. अहवाल मध्ये तक्रारी  तारीख, ठिकाण आणि तीव्रतेनुसार वेग वेगळे केलेले असतील तसेच तक्रारदाराची तपशील माहीती असेल उदा. नाव, नंबर, ठिकाण इ.